श्री शनिजयंती उत्सव

Date: 
Sun, 20/05/2012 08:00 - 10:00

रविवार दि.२० मे २०१२ रोजी श्री शनिजयंतीच्या उत्सवात सहभागी व्हा
आपल्या आनंदाच्या दिवसात सारे जग आपल्याबरोबर असते परंतु, दु:खात, अडचणीत, साडेसातीत आपण शरण जातो ते शनी महाराजांना. आपले रक्षण करावे म्हणून आपण त्यांची प्रार्थना करतो व ते त्याला प्रतिसाद देतातही.
आपण आपल्या कुटुंबियांचा वाढदिवस आनंदाने साजरा करतो, समाजातील प्रतिष्ठीत लोकांच्या वाढदिवसात प्रयत्नपूर्वक हारतुरे घेऊन सहभागी होतो कारण, आपल्याला त्यांची आवश्यकता आहे.

Venue: 
कार्यक्रम: श्री शनी महात्म्य पठण, हवन, सामुदायिक प्रार्थना, आरती वेळ: सकाळी ८ ते १२ संत श्री राममारुती महाराज संस्थान, राममारुती चौक, कल्याण (प.)

संकल्प सिद्धी योग व्रत विशेष समाप्ती

Date: 
Sun, 20/05/2012 08:00 - 12:00

संकल्प सिद्धी योग व्रत हा साधकांच्या योग्य मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे. हि उपासना सात दिवसांची असून सातव्या दिवशी त्याची समाप्ती केली जाते.
श्री शनी जयंती दि. २० मे २०१२ निमित्त संकल्प सिद्धी योग व्रत विशेष समाप्ती कार्यक्रम आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी वाचा "प्रार्थना साहित्य - संकल्प सिद्धी योग व्रत".

Venue: 
ठिकाण: संत श्री राममारुती महाराज संस्थान, राममारुती चौक, कल्याण (प.) वेळ: सकाळी ८ ते १२

आपले सदगुरु

large_maharaj.jpgश्री विश्वचैतन्य स्वामींनी जेव्हा आपले अध्यात्मिक कार्य सुरु केले तेव्हा त्यांच्या भोवती जमलेल्या कार्यकर्त्यांनी `श्री विश्वचैतन्यशनैश्वरमहाराज उपासना व सेवा प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना केली. हिन्दू समाजाला जातीपातीच्या, उच्चनीच, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असल्या चुकीच्या विचारातून बाहेर काढून परमेश्वर सर्वांसाठीच आहे या विचारांचा त्यांनी प्रचार केला व समाजातील अनेकांनी तो स्वीकारलाही! स्वामीजी विश्वबंधुत्वासाठीही कार्य करीत आहेत. या सर्वांचा साकल्याने विचार करूनच विश्वचैतन्यशनैश्वर उपासना सेवा कार्याची संकल्पना आकारास आली. सकारात्मक समाजाची निर्मिती तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक होते.
प्रार्थनेचे विज्ञान म्हणजे विश्वमनाशी अंतर्मनाद्वारे संवाद साधण्याचे विज्ञान होय. हे विज्ञान आपल्या उत्कर्षासाठी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी उपलब्ध करून दिले आहे आणि म्हणूनच आपण त्यांना कल्पवृक्ष अध्यात्म विज्ञानाचे जनक म्हणतो. ज्यांना श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने याचा वापर करावयाचा आहे, त्यांनी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे स्मरण करून, त्यांच्या नावानेच प्रार्थना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तांब्याची तार हि विजेची वाहक आहे, हवा हि ध्वनीची वाहक आहे त्याप्रमाणे मन हे भावनेचे, श्रद्धेचे वाहक आहे. त्याद्वारे तुम्ही स्वतः श्री स्वामिजींशी सलग्न होऊ शकता. साधकांनी श्री स्वामिजींशी सलग्न होण्याच्या या प्रक्रियेला व त्याद्वारे साधकांनी प्रगत होण्यालाच श्री स्वामीजी उपासना असे म्हणतात.

Syndicate content